मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले हे अर्ज दाखल करणार आहेत. तर भारतीय जनता पक्षाकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.
काँग्रेसकडून नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरतील. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विधीमंडळ कामकाजाचा अनुभव आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही स्पष्ट केले की विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील.