नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जयंती दिनी पंतप्रधानांनी अयोध्येतील एका रस्त्याला आज लतादिदींचे नाव देण्यात येणार आहे.
गायनसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज ९३वी जयंती आहे. या निमित्ताने अयोध्या येथील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी लता मंगेशकर यांच्या जयंती दिनी अभिवादनपर ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, लतादीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. मला खूप काही आठवतंय…असंख्य संभाषणे ज्यात त्यांनी खूप आपुलकीचा वर्षाव केला. आज अयोध्येतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येत आहे, याचा मला आनंद आहे. महान भारतीय व्यक्तिमत्वाला खरी श्रद्धांजली आहे.
अयोध्या येथील एका मोठ्या चौकात १४ टन आणि ४० फूट वीणा पुतळा बसवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी आज या चौकाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय पर्यटन मंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.