नालबंदी ग्रामपंचायततर्फे स्व.वसंतराव नाईक यांना अभिवादन

 

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायततर्फे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची 108 वी जयंती साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच लिलाबाई राठोड यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. माजी सरपंच मोरसिंग राठोड यांनी स्व.वसंतराव नाईक यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी उपसरपंच बद्रीनाथ राठोड, ग्रामसेवक वृषाली वाघ, ग्रा.पं.सदस्य लक्ष्मण राठोड, इंदल जाधव, जोरसिंग जाधव, शिवाजी जाधव, मोहन राठोड, चंद्रसिंग राठोड, प्रकाश चव्हाण, बद्री चव्हाण, राजाराम राठोड, रमेश राठोड, हंसराज राठोड, अनिल चव्हाण, गंगाराम राठोड, शिवदास राठोड आदी उपस्थित होते.

Protected Content