यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील नगर परिषदच्या माध्यमातुन शहरात मध्यरात्रीच्या सुमारास नळाव्दारे होणाऱ्या पाणीपुरठ्याच्या वेळेत बदल व्हावा, अशी मागणी शहरातील महिलांकडून मोर्चा काढून नगर परिषदला निवेदन देण्यात आले.
दरम्यान, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष जुगल पाटील व शहराध्यक्ष आकाश चोपडे यांनी व सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मांडली. महिलांच्या व्यथा, यावेळी नगर परिषदेवर मोठया प्रमाणावर महीलांनी आपला मोर्चा आणुन अधिकाऱ्यांना समस्या व अडचणीची जाणीव करून दिली .
यावल नगर परिषदच्या माध्यमातुन शहरातील खाजगी व सार्वजनिक नळांना मध्यरात्री किंवा अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठयामुळे शहरातील शेकडो नागरीकांना व विशेष करून महीलांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून शहरातील विविध क्षेत्रातील राहणाऱ्या महीलांनी यावल नगर परिषदवर आपणा मोर्चा आणुन आपल्या पाणीपुरवठया बाबत च्या समस्या व व्यथा मांडल्यात.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जुगल पाटील , शहराध्यक्ष आकाश चोपडे यांनी महीलांच्या मागणीस आपल्या पाठींबा दर्शविला व तात्काळ या समस्याचे निराकरण करावे अशी भूमिका घेतल्याने महिलांच्या मागणीला बळ मिळाले या वेळेस उपास्थित पाणीपुरवठा विभागाचे पाणी वितरण प्रमुख डी .एच. धोत्रे यांनी आपण त्वरीत शहरातील नळाव्दारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळे बदल करू असे आश्वासन देत नगर परिषदचे पाणी वितरण प्रमुख डी .एच .धोत्रे यांनी यावेळी महीलांना दिले.
व यानंतर शहरात होणाऱ्या रात्री ३ वाजता होणाऱ्या पाणीपुरवठयात एका तासाचा बदल करण्यात आले असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली त्यामुळे रात्री ३ वाजता होणारा पाणीपुरवठा ४ वाजता करण्यात आली आहे.
यावेळी नगर परिषद चे वरिष्ठ अभीयंता सईद शेख ( मिस्त्रि) महाराष्ट्र नवनिर्माण तालुका उपाध्यक्ष ) गणेश येवले, शहर उपाध्यक्ष दुर्गेश कोळी , चेतन सपकाळे, बंटी चोपडे, बापु माडीक, मुकेश घोडके आदी मनसे पदाधिकारी व महीला उपस्थित होत्या .