Home Cities भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

0
29


भुसावळ प्रतिनिधी । येथील नाहाटा विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक तर प्रमुख पाहुणे प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, डॉ.ए.डी. गोस्वामी, प्रा.यू.बी.नंदाणे, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील, सचिव प्रा.डॉ. जी.आर. वाणी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मोहन फालक म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला मदत केल्यास यातून गरजूंना मदत करता येणार आहे. याप्रसंगी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दीपक पाटील यांनी केले. तर आभार प्रा. सी. एच. सरोदे यांनी केले.दरम्यान, माजी विद्यार्थी संघटनेच्या सल्लागारपदी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बर्‍हाटे, प्रा. ई. जी. नेहेते, आमदार संजय सावकारे यांची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound