फैजपूर प्रतिनिधी । येथील जिल्हा दूध संघाचे संचालक व माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक हेमराज चौधरी व माजी नगराध्यक्षा अमिता चौधरी यांचे चिरंजीव सर्वेशच्या वाढदिवसानिमित्त काल सायंकाळी आराधना कॉलनीत वृक्षारोपण करण्यात आले.
याचबरोबर, सौजन्याने वृक्ष रोपांसह ७५ जाळीचे पिंजरे उपलब्ध करून बसवण्यात असून ट्री गार्ड ही उपलब्द करून देण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक हेमराज चौधरी यांनी सांगितले की, माझ्या वार्डातील प्रत्येक नागरिकांने वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. तसेच वृक्ष संगोपनासाठी जी मदत लागेल, ती मी पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्षा महानंदा होले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, नितीन राणे, नगरसेविका शकुंतला भारंबे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र होले, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक डॉ. इम्रान, जितु भारंबे, भुषण चौधरी, विजू पाटील, रवींद्र जोगी, जयंत वर्मा, संजय रल, संजय सराफ, ग्रामसेवक बढे, राहुल राणे, तुषार तळेले, जितेंद्र इंगळे, ज्ञानदेव चौधरी, गोकुळ चौधरी, राजेंद्र कोलते, भुषण चौधरी, विनोद (व्ही.के) कोल्हे, गणेश चौधरी, चेतन चौधरी, सागर चौधरी व गोपी पाटील आदी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.