नगरदेवळा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांची अरेरावी ; टाळे ठोकण्याचा निवदेनाव्दारे इशारा

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील ‘सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया’ शाखेतील कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीमुळे, सेवा देण्यास टाळाटाळ करण्याच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांच्या नजरेतून उतरत चालली आहे असून सुधारणा न केल्यास बँकेला टाळे ठोकणार असल्याचे इशारा महिलावर्गाने ब्रँच मॅनेजर धनंजय रोकडे यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया नगरदेवळा शाखा ही परीसरातील एकच जुनी व ग्राहकांची विश्वासपात्र बँक आहे. मात्र या दोन वर्षांच्या कालखंडात कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीमुळे, कर्मचारी यांच्या अरेरावी मुळे व सेवा सुविधा देण्यास टाळाटाळ करण्याच्या प्रवृत्तीमुळे नकोशी झाली असून अनेक ग्राहक खाते बंद करण्याच्या निर्णयाप्रत आलेले आहेत. या बँकेतील प्रिंटर मशीन गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळं पासबुकांत किती रक्कम आहे हे बघता येत नाही, रक्कम काढतांना अडचण येते, अकाऊंट चे आयकर करीता लागणारे मिनी स्टेटमेंट द्यायला कर्मचारी तयार नाहीत, नंतर त्यांना पैसे देऊन बाहेर प्रिंट काढावी लागते, पैसे काढण्याची सोयीची असलेली टोकन पद्धत बंद आहे त्यामुळं तासन्तास रांगेत उभे राहावे लागते, जेष्ठ नागरिकांना पैसे टाकणे किव्हा काढण्यासाठी स्वतंत्र खिडकी नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही., कर्जाच्या फाईली धूळ खात पडून राहत असून लवकर त्याकडे बघितले जात नाही., एटीएम मशीन मध्ये पैसे नसल्याने ते बंदच राहते., महिलांना असभ्य वर्तणूक दिली जात आहे. रोजगार बुडवून दिवसभर गावातील व खेड्यापाड्यातील नागरिक उभे राहतात व कर्मचारी नसल्याचे कारण सांगून त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे याविषयी सर्व सोयीसुविधा ग्राहकांना द्याव्यात व कामाचा भार पडत असेल तर राजीनामे द्यावेत अन्यथा गावातील नागरिक व महिला बँकेला टाळे ठोकतील असे ब्रँच मॅनेजर धनंजय रोकडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रीयकृत बँका या पब्लिक सेक्टर मध्ये येत असून कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सौजन्यची वागणूक दिली पाहिजे पण तसे घडत नाही. आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही या तोऱ्यात ते दिसतात. निवेदनावर अंजली चौहान, अभिलाषा रोकडे, भाग्यश्री पाटील, हेमलता महाजन, सरिता निकम, माधुरी महाजन, सविता पवार, अनिता परदेशी, प्रतिभा पाटील, पूनम पाटील यांच्यासह अनेक सह्या आहेत.

 

 

 

Protected Content