मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यात सालाबाद प्रमाणे यावर्षी आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळ्यामध्ये मुक्ताईनगर नगरपंचायतमार्फत चित्ररथ तयार करून दिंडीमध्ये सहभाग घेण्यात आला. या चित्ररथाद्वारे सर्वसामान्य जनतेला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छतेचा व वसुंधरा जपण्याचा व तिचे संवर्धन करण्याचा संदेश दिला.
अशाप्रकारे दिंडीच्या कार्यक्रमातून पर्यावरण व स्वच्छतेचा संदेश दिल्यामुळे शहरात तसेच येणाऱ्या भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. भाविकांनी तसेच शहरातील नागरिकांनी याचे विशेष कौतुक केले आणि नगरपंचायतने घेतलेल्या सहभागाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. मुख्याधिकारी तथा प्रशासक गजानन तायडे, प्रभारी आरोग्य विभाग प्रमुख श्रीपाद मोरे, कार्यालय अधीक्षक, दीपक जग्रवाल, करनिरीक्षक श्री अच्युत निळ व सर्व नगरपंचायत कर्मचारीवृंदांनी या दिंडीमध्ये आनंदाने सहभाग घेतला व दिंडी मध्ये आलेल्या वारकऱ्यांचे मानाची टोपी देऊन सत्कार करण्यात आला.