जळगाव, प्रतिनिधी | शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्ताने जळगाव शहरात गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार ११ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता गुरुद्वारा येथून भव्य नगर कीर्तन दरबार मिरवणूक आयोजित करण्यात आली.
श्री गुरुनानक जयंतीनिमित्ताने गुरुद्वारा येथे कालपासून गुरु ग्रंथ साहेब यांचे अखंड पाठ सुरू असून त्याची समाप्ती उद्या दहा वाजता होणार आहे. श्री गुरुनानक देवजी महाराज यांच्या जयतीनिमित्त गुरुद्वारातर्फे शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक वेभूषेत समाजबांधव उपस्थित होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मिरवणुकीत पंचप्यारे यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पालखी मिरवणुकीत सहभागी महिलांनी गुरुनानक देवजी यांचे कीर्तन सादर केले.