नागलवाडी येथे अरुणभाई गुजराथी यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप

arunbhaii

चोपडा प्रतिनिधी । येथील पीपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट तर्फे नागलवाडी येथे माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या हस्ते (दि. 20 जून) रोजी वह्या वाटप करण्यात आल्या आहेत.

यावेळी कार्यक्रमासाठी पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोपडा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, संचालक सुभाषभाई मणिलाल गुजराथी, विकास गुजराथी, नगर परिषदेचे गटनेते जीवन चौधरी, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी लतीष जैन, क्षितिज चोरडीया, नागलवाडीचे माजी सरपंच धरमदास पाटील, डॉ.पी.एन. महाजन, प्रमोद पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब ढबू तसेच सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. पीपल्स बँकेच्या उपक्रमा बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर .बी .पाटील यांनी केले.

Protected Content