ना.हरिभाऊ जावळेंनी दिल्या प्रशासनाला सतर्कतेच्या सुचना

4haribhau jawle

 

फैजपूर प्रतिनिधी । गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनुचित घटना रोखण्यासाठी प्रशासनाला सज्ज आणि सतर्क राहण्याच्या सूचना ना. हरिभाऊ जावळे यांनी प्रांताधिकारी डॉं. अजित थोरबोले, यावल तहसीलदार जितेंद्र कुवर, रावेर तहसीलदार उशाराणी देवगुणे यांना दिल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात चार ते पाच दिवसांपासून सतत संततधार पाऊस सुरू आहे. तसेच हवामान विभागाने येणाऱ्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अश्या वेळेस ग्रामसेवक आणि तलाठी यांनी आपल्या गावकऱ्यांना सतर्क करून येणारा धोका रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना ना.आ. हरिभाऊ जावळे यांनी दिल्या आहेत. या

सततच्या पावसामुळे नदी, नाले, विहिरी भरगच्च भरल्या आहेत. जिल्हय़ातील काही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. पडके आणि मातीची घरात राहणा-यांना याबाबत योग्य ती काळजी घेण्याच्या सुचना ग्रामांस्थाना देण्यात याव्या. पूर असताना नदी ओलांडू नये. पावसामुळे विजेचे पोलमधून वीज उतरण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामस्थांना त्याबाबत जागृत करण्याच्या सूचना ही देण्यात याव्या. अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनासह सर्व जनतेने काळजी घेण्याचे आवाहन आमदारांनी केले आहे. काही अडचण निर्माण झाल्यास प्रशासनासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय ०२५७ -२२२३१८० / २२१७१९३ वर संपर्क साधावा असे आवाहन ना. हरिभाऊ जावळे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

Protected Content