Home राजकीय लोकसभेची लढाई ही मोदी-शहांच्या विरोधात-राज

लोकसभेची लढाई ही मोदी-शहांच्या विरोधात-राज

0
37

मुंबई प्रतिनिधी । आपला पक्ष आगामी निवडणूक लढवणार नसले तरी मोदी व शहांपासून मुक्तीसाठी भाजपला मतदान करू नका असे आवाहन आज राज ठाकरे यांनी केले.

आज रंगशारदामध्ये राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली. याप्रसंगी त्यांनी मोदी आणि शाह या जोडगोळीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, मी कोणाकडे जागा मागयला गेलो नाही, मला लोकसभा निवडणूक लढवण्यात काहीही रस नाही. ही लोकसभा निवडणूक मोदी, शाह यांच्या विरोधात देश अशीच असणार आहे. माझ्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी कोण? हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मोदीविरोध हीच माझी भूमिका आहे. जे काही करायचं आहे ते मोदी आणि भाजपाच्या विरोधात करायचं आहे असंही आवाहन मनसैनिकांना राज ठाकरेंनी केलं. लोकसभेची लढाई ही कोणत्याही विशिष्ट पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह या दोघांच्या विरोधात आहे. त्यांच्या उमेदवारांना मत देऊ नका असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं. भाजपाची लोकं तुमच्याकडे येतील, त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर घ्या, त्यांनी देश लुटलाय, तुम्ही त्यांना लुटलं तर हरकत नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी एअर स्ट्राईकबाबतही टीका केली. ते म्हणाले की, खोट्या प्रचाराला भुलू नका. नरेंद्र मोदी हा अत्यंत खोटारडा माणूस असल्याचा आरोप त्यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound