मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे जयंतीनिमित्त मुक्ताईनगर शहरातील श्री संत संताजी जगनाडे महाराज मंगल कार्यालय येथे ८ ते १५ डिसेंबर दरम्यान सार्वजनिक संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कथा वाचक बाल व्यास कृष्णानंद जी महाराज (श्री धाम वृंदावन) हे करणार आहे. गायत्राचार्य हभप संतोष महाराज वडवे, हभप उमेश महाराज, मृदंगाचार्य निखिल महाराज, तबला वादक हभप कुणाल महाराज, आर्गन हभप अर्जुन भैया, ऑटो पॅड हभप रुपेश महाराज, बासुरी वादक हभप राजेश राठोड जळगाव हे आहेत. दैनंदिनी कार्यक्रमात दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, दुपारी १२ ते ५ कथा वाचन, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ ,रात्री ८ ते १० हरिकीर्तन असे दैनिक कार्यक्रम आहेत.
यांचे होणार किर्तन
८ डिसेंबर रोजी हभप अरुण महाराज नायसे दहिगाव, ९ डिसेंबर हभप दुर्गाताई मराठे, मुक्ताईनगर, १० डिसेंबर हभप मीनाक्षीताई सणांसे भुसावळ, ११ डिसेंबर हभप अमोल महाराज कासलीकर, १२ डिसेंबर हभप रेलकर महाराज रेल, पारधी, १३ डिसेंबर हभप लखन महाराज कांडवेल, १४ डिसेंबर हभप आकाश महाराज नांद्रा हवेली, १५ डिसेंबर रोजी हभप प्रवीण महाराज वाघोळा यांचे काल्याचे किर्तन होईल नंतर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी अंबिका ज्वेलर्स मुक्ताईनगर यांचे सौजन्य असून इस्कॉन परिवार (हरेकृष्ण परिवार) मुक्ताईनगर तालुका, ज्येष्ठ नागरिक संघ मुक्ताईनगर तालुका, श्री संत मुक्ताई संस्थान, पंचक्रोशीतील समस्त सनातन हिंदू समाज यांचे विशेष सहकार्य आहे. तेली समाज, श्री सर्व समाज विशाल गणेश मंडळ ,हिंदवी स्वराज दुर्गा मंडळ मित्र मंडळ मुक्ताईनगर यांचे अनमोल सहकार्य आहे.