Home Cities जळगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची उचलबांगडी !

एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची उचलबांगडी !

0
259

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इच्छा देवी चौकात खासगी वाहनात गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावरून जोरदार टिका सुरू असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आले आहे. असे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहे.

अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा महिन्यांपूर्वी पोलिस निरीक्षक म्हणून दत्तात्रय निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात इच्छा देवी चौकात खासगी वाहनात गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन ११ जण भाजले गेले होते. यातील सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जोरदार टीका सुरू होती. त्यामुळे निकम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घटना घडली त्यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता होती. आचारसंहिता संपताच बदली विषयी हालचाली गतिमान झाल्या. अखेर शनिवारी ७ डिसेंबर रोजी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. येथील पदभार दुय्यम अधिकाऱ्याकडे देण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.


Protected Content

Play sound