मुंबई प्रतिनिधी । मुंबईसह काल दि. 26 जुलै च्या संध्याकाळपासून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला असून, 13 रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे अंबरनाथ परिसरात रेल्वे रुळांवर पाणी आले असून, त्यामुळे मध्य रेल्वेच्या 13 ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. तर 6 रेल्वे गाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबवण्यात आला आहे. तर 2 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेचे पीआरओ सुनील उदासी यांनी रेल्वेच्या वाहतुकी विषयीची माहिती देताना सांगितले की, उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे मध्य रेल्वेच्या 13 ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. तर 6 रेल्वे गाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबवण्यात आला आहे. तर 2 ट्रेन रद्द करण्यात आल्या.”