गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांची हत्या

0
38

अकोला प्रतिनिधी । येथील ख्यातप्राप्त प्रॉपर्टी ब्रोकर तथा गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, किसनराव हुंडीवाले हे प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून ख्यात आहेत. आज भर दिवसा सार्वजनीक न्यास नोंदणी कार्यालयातच हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेले स्थळ म्हणजेच सार्वजनीक न्यास कार्यालय हे जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानाच्या अगदी जवळ आहे. दरम्यान, किसनराव हुंडीवाले हे गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांच्या निर्घृण हत्येचा राज्यभरातील समाजबांधवांनी तीव्र निषेध केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here