जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील तुळजामाता नगर परिसरात भाजीविक्रेत्या महिलेचा मध्यरात्री धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस कर्मचारी दाखल झाले असून उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
वंदना गोरख पाटील (वय-४२) रा. तुळजामाता नगर, रामेश्वर कॉलनी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना पाटील ह्या भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. रमेश वंजारी यांच्याघरात भाड्याने राहातात. त्याचे पती गोरख पाटील यांचे १५ ते २० वर्षांपुर्वी मयत झालेले आहे. त्यांचा मुलगा दिपक गोरख पाटील हा पत्नीसह लातूर येथे नोकरीच्या निमित्ताने राहतो. त्यामुळे वंदना पाटील ह्या घरी एकट्याच राहतात. वंदना पाटील याचा घरात दरवाजा सकाळी ९ वाजेपर्यंत बंद असल्यामुळे शेजारी राहणारा तरूणी कुणाल पाटील याला शंका आली. दरवाजा ढकलून बघितले तर वंदना पाटील यांचा खून झाल्याचे दिसून आले. त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. खून झाल्याची वार्ता रामेश्वर कॉलनीत वाऱ्यासारखी पसरली.
घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आली. काही वेळातच एमआयडीसी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक अंदाजानुसार महिला झोपेत असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात कोणत्यातरी हत्याराने घाव घालून त्यांचा खून करण्यात आले तर पोटात धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोली अधिक्षक कुमार चिंता यांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, अज्ञात संशयित आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.