सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । शहरात भर दिवसा एका प्रौढ व्यक्तीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत वृत्त असे की, सावदा येथील ख्वाजा नगर परिसरात गुरूवारी सायंकाळी तिघा अज्ञात इसमांनी रईस दिलदार चौधरी उर्फ रईस दंगा (५०) या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला चढवून त्याचा खून केल्याची घटना घडली.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर अवघ्या पाच तासांच्या आत पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवून अजहरखा अयुबखा, राजूशहा उर्फ गुलाबशहा दाऊदशहा आणि शाहरूख खान कलीम खान या तिघांना अटक केली होती. एपीआय राहूल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.