भुसावळ संतोष शेलोडे । शहरातील श्रीराम नगरमधील भयंकर हल्ल्यात तरूणावर चाकूने वार करून नंतर गोळीबार करत खून करणारे तिन्ही आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. भुसावळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंता व्यक्त होत असतांना या घटनेने परिसर अक्षरश: सुन्न झाल्याचे दिसून येत आहे. पहा याबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.
भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागातील रहिवाशी विलास दिनकर चौधरी या तरुणावर पाच ते सहा तरुणांनी दिनांक २५ ऑगेस्ट २०२० रोजी घरात घुसून चाकू हल्ला करून गोळीबार करण्यात आल्याची घटना रात्री अकराच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात फिर्यादी दिनकर लक्ष्मण चौधरी (वय ६५ राहणार श्रीराम नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय न्हावकर, अभिषेक शर्मा व आकाश गणेश पाटील (सर्व राहणार श्रीराम नगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांचा मयत विलास सोबत दिनांक २० रोजी वाद झाला होता. त्याचा राग मनात घरून आरोपींनी रात्री अकराच्या सुमारास विलास हा सिमेंटच्या पाईपावर बसून मोबाईल खेळत असतांना अचानक हल्ला चढविला.
या तिन्ही आरोपींना विलास यांच्यावर चाकूने उजव्य हाताच्या कोपर्यावर,मनगटावर,दंडावर गंभिर जखमी करत अभिषेक शर्मा याने पिस्तुल मधून एक गोळी फायर केली. तसेच विलासच्या छातीवर,मानेखाली उजव्या बाजूला फिर्यादीच्या पत्नीच्या (मयत विलासची आई ) डोक्यावर पिस्तूलने जोरात मारून जखमी केले. हा हल्ला झाल्यानंतर विलास पळून घरात आला व त्याने दरवाजा बंद करून घेतला. मात्र काही वेळाने आरोपींनी मागील दरवाजा खोलून घरात बसलेल्या विलासवर गोळीबार केल्याने तो मृत झाला.
दरम्यान, या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ८००/२०२० भा.द. वि .कलम ३०२,३२३,३४ आर्म अँक्ट ३(२५),३(२७) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने तिघा आरापींना ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे.
आज दुपारी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी घटनास्थळाची पाहणी केली.फॉरेन्सीक लॅबच्या पथकाने घटनास्थळी येऊन नमुने घेतले आहे.
तसेच अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो कॉ विकास सातदिवे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे कृष्णा देशमुख,संदीप परदेशी अशांनी मिळून तिघे आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अनिल मोरे करीत आहेत.
भुसावळ शहरातील गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगार आता घरात घुसून बिनधास्तपणे गोळीबार करीत आहे. भुसावळ शहरात बंदुकी, तलवार सर्रासपणे मिळून देखील पोलीस प्रशासन मौनवृत्त धरून बसलेले दिसत आहे.घटनेमुळे गुन्हेगारावरील पोलिसांचा वचक कमी झालेला दिसत आहे.
खालील व्हिडीओत पहा भुसावळातील खुनाबाबतचा वृत्तांत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/311634816609463