Home क्राईम खुनाने हादरले भुसावळ : अयान कॉलनीत एकाची क्रूर हत्या !

खुनाने हादरले भुसावळ : अयान कॉलनीत एकाची क्रूर हत्या !

0
340

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या भुसावळमध्ये आज रात्री एका इसमाचा खून झाला असून एक जण जखमी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात असलेल्या अयान कॉलनी या भागात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका व्यक्तीचा खून झाला असून एक जण जखमी झाला आहे. याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासाची सूत्रे हलविली आहेत.

दरम्यान, या प्रकरणात समद इस्माईल कुरेशी यांची क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आली असून यात एक जण अजून जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भयंकर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राहूल वाघ आणि त्यांचे सहकारी तपास करत आहेत.


Protected Content

Play sound