रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर नगरपालिका व पोलिसांची संयुक्त कारवाई (व्हिडीओ)

जामनेर प्रतिनिधी | जामनेर शहरातील रस्त्यावर अतिक्रमण करून भाजीपाला विक्री करणाऱ्यावर नगरपालिका व पोलिसांची संयुक्त कारवाई केली. यावेळी “रस्त्यात बसले तर कारवाई होणारचं” असा इशारा नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी दिला.

आठवडे बाजारात जागा असतानासुद्धा भाजीपाला विक्रेते पाचोरा रस्त्यावर भाजीपाला विक्रीसाठी तर फळविक्रेते गांधी चौकात रस्त्यात दुकान थाटतात. यामुळे रहदारीस अडचण होत असल्यामुळे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी गुरुवारी रस्त्यावर उतरत नगरपालिका आणि पोलीस यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. आता यापुढे रस्त्यात बसले तर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगीतले.

जामनेर शहरातील गांधी चौक या भागामध्ये नागरिकांची वर्दळ असते.या परिसरात अनेक भाजीपाला विक्रेते व फळविक्रेते रस्त्याच्या मधोमध आपली दुकाने लावून ठेवत असल्यामुळे वाहनासह पायी चालणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. भाजीपाला विक्रेते श्रीराम मार्केटमधील आठवडे बाजाराची जागा सोडून पाचोरा रोडवरील रस्त्यावर येऊन बसतात. मुख्य रस्ता असल्याने बऱ्याच वेळा वाहतुकीची कोंडी होऊन अडचण निर्माण होते. अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे गुरुवार, दि.13 रोजी नगरपालिका मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, उपमुख्य अधिकारी दुर्गेश सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल महेश कमोदकर, रियाज शेख, योगेश महाजन, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वप्ना देशमुख यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली असून “आता यापुढे अशाप्रकारे रस्त्यात भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते व हात गाडीवाल्याने लावले तर त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करून त्यांना दंड आकारला जाईल” अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी भोसले यांनी दिली.

व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/628265888427964

Protected Content