मुंबई आयआयटीचे विद्यार्थी करणार फैजपूरातील पावसाच्या पाण्याचे सर्वेक्षण

pani

 

फैजपूर प्रतिनिधी । येथे केंद्र सरकारच्या ग्रामीण भागासह लहान शहरामध्ये पावसाच्या पाण्याची निसारण, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा व्यवस्था, व घनकचरा व्यवस्थापन या चार मुद्द्यांच्या आधारे मुंबईतील आयआयटीचे विद्यार्थीतर्फे आज दि. 31 ऑगस्ट पासून शहराचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, फैजपूर शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. त्यातच महाराष्ट्रातून दोनच पालिकेची निवड या सर्वेक्षणात करण्यात आलेली आहे. यात शहरातील पाणी, घनकचरा, सांडपाणीसंदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या चारही प्रकल्पांसाठी एकत्रित येणारा खर्च नेहमीच्या खर्चापेक्षा खूपच कमी असणार आहे. फैजपूर नगरपरिषद सारख्या ‘क’ वर्ग नगरपरिषदेला स्वतःचा विकास करून घेण्यासाठी हे फायदेशीर ठरेल. त्यादृष्टीने या संस्थेमार्फत सामाजिक सर्वेक्षणात 30 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

हा सर्वेक्षण आजपासून दिनांक 31 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येत असून मुंबईतील विद्यार्थ्यांचा सहभाग या सर्वेक्षणात करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा सर्वेक्षण होत असून, प्रथम दोन पालिकेवर याचा प्रयोग करण्यात येत आहे. हा प्रयोग फायदेशीर ठरल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक पालिकेवर असाच सर्वेक्षण करण्यात येईल. या सर्वेक्षणाचा आयआयटी अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे.
प्रत्येक दिवशी दोन प्रभागात सर्वेक्षण होणार आयआयटी मुंबई व पालिकेच्या संयुक्त विद्यमानाने शहरात 8 दिवस सर्वेक्षण आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी करणार आहे. प्रत्येक दिवशी दोन वार्डात प्रत्येक घरोघरी जाऊन चार मुद्द्यांच्या आधारे सर्वेक्षण केला जाणार आहे.
नागरिकांनी सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. त्यामुळे नागरिकांनी या सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा व विचारलेल्या योग्य प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे.

Protected Content