Home क्रीडा मुंबईचा हैदराबादवर दणदणीत विजय

मुंबईचा हैदराबादवर दणदणीत विजय

0
35

हैदराबाद वृत्तसंस्था । अलझारी जोसेफने केलेल्या भेदक मार्‍याच्या बळावर मुंबई इंडियन्सने हैदराबादला ४० धावांनी धुळ चारली.

मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करतांना ७ बाद १३६ इतक्या धावा केल्या. कायरन पोलार्डच्या ४६ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाने टिकाव न धरल्यामुळे या संघाचा डाव लवकर आटोपला. खरं तर १३७ धावांचे लक्ष्य हे फारसे मोठे नव्हते. तथापि, अलझारी जोसेफच्या गोलंदाजीसमोर हैदराबादच्या फलंदाजांची अक्षरश: नांग्या टाकल्या.

हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो फक्त १६ धावा करून तंबूत परतला. तर डेव्हिड वॉर्नरदेखील १५ धावा करून बाद झाला. यानंतर ठारावीक अंतराने फलंदाज बाद होत गेले. अलझारी जोसेफने फक्त १२ धावा देत ६ बळी टिपले. आयपीएलमधील ही आजवरची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे. यामुळे जोसेफ हाच मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound