मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल गनीचा जेलमध्ये मृत्यू

jail

 

नागपूर (वृत्तसंस्था) मुंबईत 1993 ला झालेल्या सिरीअल बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अब्दुल गनीचा नागपूर सेंट्रल जेलमध्ये मृत्यू झाला आहे. गणीला काही दिवसांपूर्वी जी.एम.सी. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

 

12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब ब्लास्टमध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 लोक गंभीर जखमी होते. गनीवर सेंचुरी बाजार याठिकाणी आरडीएक्स ठेवल्याचा आरोप होता. याप्रकरणी अब्दुल गनीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 1993 मधील मुंबई साखळी बॉम्ब ब्लास्टने संपूर्ण देशाला हादरवले होते. या प्रकरणात दाऊद इब्राहिम, याकूब मेमन त्याचबरोबर त्याचा भाऊ टाइगर मेमन हे मुख्य आरोपी आहेत. यातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आणि टाइगर मेमन हे तेव्हापासूनच देश सोडून फरार झाले आहेत.

Add Comment

Protected Content