मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । सध्या जोरदार पावसाळा सुरु असून देखील येथे नागरिकांना पिण्यासाठी वेळेवर पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर शहरात बऱ्याच दिवसापासून पाणीपुरवठा झालेला नसून बऱ्याच लोकांच्या घरी पिण्यास पाणी नसून पाण्यासाठी भटकंती चालू आहे अगदी शौचालयात जाण्यासाठी सुद्धा पाणी नाही म्हणून नाईलाजाने उघड्यावर जावे लागत आहे. प्रशासनाने मात्र हात वरती केले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात पाणी गाळून प्यावे, उकडून प्यावे, नळ येणार नाहीत, मोटर जळाली आहे अशा सूचना जाहीर दवंडीद्वारे सूचना यायच्या मात्र एक वर्षापासून त्या सुद्धा बंद झालेले आहेत मुक्ताईनगर शहरात प्रचंड नागरिकांमध्ये खास करून महिला वर्गामध्ये असंतोष असून नगरपंचायत कार्यालय मुक्ताईनगर बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पाणी येत नसल्याने काही महिलांनी बोलून दाखवले की आम्ही कर भरला नाही म्हणून आमचे घरच्यांचे नाव भर चौकात लिहिल्या गेले. परत कर भरल्यानंतर सुद्धा आमच्या नावावर काळे कलर ने पुसण्यात आले, टॅक्स नाही भरला तर दर महिन्याला दोन टक्के दंड म्हणजे वार्षिक 24 टक्के दंड आकारण्यात येतो. टॅक्स भरण्यास घाई मात्र पाणी देण्यास अक्षम नगरपंचायत कार्यालयचे काम सुरु आहे. यामुळे लवकरात लवकर टँकर दारे प्रत्येक घरी दर दिवशी 200 लिटर पाणीपुरवठा करावा अशी महिला वर्गांची मागणी आहे.
एकीकडे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा घंटागाडी मध्ये टाकण्यात यावा साठी नगरपंचायतने महिलांना दर महिन्याला लकी ड्रॉ करून पैठणी साडी दिली जाईल असे सांगण्यात आले. प्रत्येक प्रभागात एक दर महिन्याला १७ प्रभागांमध्ये १७ साड्या पैठणी वाटणार असल्याचे सांगण्यात आले. पण महिला वर्ग विचारत आहे की त्याचे काय झाले किती महिने झाले कोणाला पैठणी साड्या मिळाल्या की नुसतीच घोषणा होती ?
एकीकडे पाणी टंचाई असतांना स्वछता देखील नसल्याने लोक संतापले आहेत. अस्वच्छ पाणी पिऊन रोगराई वाढीस लागली त्या पाठोपाठ मच्छरांनी थैमान घातले असून सरकारी दवाखान्यामध्ये लांबच लांब रांगा लागल्यात अगोदरच बेरोजगारी हाताला काम नाही त्याच्यामध्ये दवाखान्यांमध्ये गोरगरीब कष्टकरी भरडला जात आहे.