मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हळदी कार्यक्रमाप्रसंगी घडलेल्या किरकोळ वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील चिखली येथे घडली आहे.
मुक्ताईनगर पोली स्थानकात चिखली येथील हाणामारी प्रकरणी दोन गटांनी एकमेकांच्या विरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक फिर्याद ही एका महिलेने दाखल केली आहे. यानुसार २० मे रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान जत्यांचा मुलगा चिंटू याचा हळदीचा कार्यक्रम सुरू असतांना झालेल्या वादातून त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला. यात त्यांचे पती राजेंद्र कांडेलकर व मुलगा चिंटू राजेंद्र कांडेलकर हे जखमी झाली. तसेच या महिलेचा विनयभंग करून सुमारे दीड लाख रूपये मूल्य असणारी सोन्याची चेन लांबविण्यात आली आहे. या प्रकरणी शेख समद शेख सुलतान खाटीक ( सुभाष खाटीक ); विजय नामदेव काकडे, शेख शोएब शेख समद खाटीक, शेख समील शेख समद खाटीक, शेख जुबरे शेख गुफ्रान खाटीक, प्रभाकर मारूती सोनवणे, गजानन श्रीधर सोनवणे, अनिल रामराव खिरोळकर, जावेद गुफ्रान खाटीक, परवेज गुफ्रान खाटीक, आसीफ मुश्ताक खाटीक, शरीफ सुलतान खाटीक, गजानन रामदास पाटील, मंगेश नारायण खिरोळकर, सोपान कांडेलकर ( सर्व रा. चिखली, ता. मुक्ताईनगर ) आणि शेख जाकीर शेख शकूर खाटील ( रा. मुक्ताईनगर) यांच्या विरोधात भादंवि कलम ३२७, ३२४, ३२३, ३५३, ३५४, १४३, १४४, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर यातील दुसरी फिर्याद ही चिखली येथील शेख समद शेख सुलतान खाटीक यांनी दिली आहे. यानुसार, २० मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्यासह मुलगा शोएब आणि पुतण्या समीर तसेच प्रभाकर मारोती सोनवणे, अनिल रामभाऊ खिरवळकर यांना लाथा-बुक्यांसह चाकूने मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्याकडील ९८०० रूपये हिसकावण्यात आले. या प्रकरणी वैभव जानराव पाटील, रवी उर्फ विक्की जानराव पाटील, राजेंद्र प्रभाकर कांडेलकर, त्यांचा मुलगा चिंट्या आणि इतर चार ते पाच जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात भादंवि कलम ३२७, ३२३, ३२४, ५०४, ५०६, १४१, १४३, १४४, १४८, १४९, भा.ह.का. ४/२५, म. पो. अधिनियम ३७ (१) सी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास डीवायएसपी प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप दुनगहू, उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे, संदीप चेढे, पोना. गजमल पाटील हे करत आहेत.