मुक्ताईनगर येथे रस्त्याची कामे निष्कृष्ट दर्जाची होत असल्याचा नागरिकांचा आरोप

WhatsApp Image 2019 05 11 at 3.48.31 PM

मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) येथील नगरपंचायतीला आलेल्या निधीमधून शहरांमध्ये सर्वत्र डांबरीकरण रस्ते तयार करण्यात येत आहेत. मात्र, या रस्त्यांच्या कामांचा दर्जा निष्कृष्ट असल्याची तक्रार नागरिकांमधून करण्यात येत आहे.

 

मुक्ताईनगर येथे संपूर्ण शहरभर नगरपंचायत झाल्यानंतर प्रथमच विकास काम म्हणून शहरात डांबरीकरण रस्ते तयार करण्याचे सुरू आहे. परंतु, या रस्त्याचे काम करतांना ठेकेदारा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. या कामांकडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ही फिरून पाहत नसल्यामुळे नागरिकांत चर्चेचे विषय बनला आहे. वादग्रस्त ठरलेल्या रस्त्याच्या ठिकाणाहून काम करत असलेले मजूर व ठेकेदाराने दिलेल्या कामगारांनी काढता पाय घेतला आहे. याठिकाणी खडीकारण करतांना आजूबाजूला डांबर व मध्यभागी फक्त खडी असल्याने येथून नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. तसेच अशा ठिकाणाहून शाळेचे लहान लहान मुलं सुद्धा सायकलवरून जात असतांना हि मुले पडून त्यांना दुखापत होण्याच्या घटना घडत आहेत. प्रभाग क्रमांक १५मध्ये अड. सचिन पाटील यांच्या घरासमोरील ३० ते ४० फुटाचा राहिलेला तुकडा हा मोजमाप न करून टाकलेल्या रस्त्याच्या वादामुळे गेल्या दहा ते बारा दिवस झाले आहे त्या अपूर्ण अवस्थेत आहे. ठेकेदार मुख्याधिकारी व उपनगरअध्यक्ष यांच्याशी आमचे मुक्ताईनगरचे प्रतिनिधी प्रवीण भोई यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधून विचारणा केली असता त्यांनी गोलमाल उत्तर देऊन इंजिनीयर मिळत नाही तसेच इंजिनियर उद्या येणार आहे व मोजमाप करून देणार आहे असे सांगितले होते. परंतु तब्बल दहा ते बारा दिवस उलटून हे काम अपूर्ण असल्याचे दिसत आहे.

Add Comment

Protected Content