मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांनी दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटपासाठी मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार यांच्या द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर यांच्या मार्फत रावेर लोकसभा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यासाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर आयोजीत करण्यात येत आहे. ही शिबिरे जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड व जामनेर तसेच बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा व मलकापूर येथे आयोजन करण्यात येणार आहेत.
या मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिरात तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने म्हणजे फोल्डिंग ट्रायसिकल, हातचलित ट्रायसिकल, मोटराईज ट्रायसिकल, कुबड्या, वॉकिंग स्टिक, कोपर कुबड्या, रोलेटर, दृष्टीबाधितांसाठी काठी, साधे कर्णयंत्र, प्रोग्रामेबल कर्णयंत्र, कृत्रिम पाय, कृत्रिम हात ई. साधने मोफत पुरविण्यात येणार आहे. या शिबिरांचा जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील जास्तीतजास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले आहे.
मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे
रावेर तालुका – दि.१३/०२/२०२३,
ठिकाण ग्रामीण रुग्णालय, रावेर
यावल तालुका – दि.१४/०२/२०२३,
ठिकाण ग्रामीण रुग्णालय, यावल
मुक्ताईनगर तालुका – दि.१५/०२/२०२३,
ठिकाण उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर
चोपडा तालुका – दि.१६/०२/२०२३,
ठिकाण उपजिल्हा रुग्णालय, चोपडा
बोदवड तालुका – दि.१७/०२/२०२३,
ठिकाण ग्रामीण रुग्णालय, बोदवड
भुसावळ तालुका – दि.१८/०२/२०२३,
ठिकाण ग्रामीण रुग्णालय, भुसावळ
जामनेर तालुका – दि.१९/०२/२०२३,
ठिकाण उपजिल्हा रुग्णालय, जामनेर
नांदुरा तालुका – दि.२१/०२/२०२३,
ठिकाण ग्रामीण रुग्णालय, नांदुरा
मलकापूर तालुका – दि.२२/०२/२०२३,
ठिकाण उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर
सर्व दिव्यांग बांधवांनी शिबिरास येतांना दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला ई. आवश्यक कागदपत्र सोबत आणावे असे कळविण्यात आले आहे.