मुक्ताईनगर पंचायत समितीत राष्ट्रवादी ‘दक्ष’ : उपसभापतीपद कायम राखण्याची शक्यता

मुक्ताईनगर, पंकज कपले । येथील नगरपंचायतमध्ये भाजपच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज पंचायत समिती उपसभापतींची निवड होत आहे. यात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादी दक्ष असून याच पक्षाचा उपसभापती होण्याची शक्यता आहे.

याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर नगरपंचायतीतल्या खडसे समर्थक सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असून चार जण वेटींगवर असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे नगरपंचायतीत शिवसेनेचे वर्चस्व निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडी होत असतांना आज येथील पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड होत आहे.

नगरपंचायतीचा अनुभव पाहता या निवडीत कोणताही दगाफटका नको म्हणून राष्ट्रवादी पक्ष दक्ष असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर या उपसभापती निवडीवर लक्ष ठेवून असून त्यांच्याच गटाचा उपसभापती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुपारी याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

Protected Content