गिरीशभाऊंनी मदत केली असती तर २५ हजार मतांनी निवडून आलो असतो ! : आ. चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | ”गिरीशभाऊ महाजन यांनी आमचे आमदार हा केलेला उल्लेख सहज बोलण्याच्या ओघातून केला असल्याने याचा वेगळा अर्थ काढू नका. त्यांनी मला निवडणुकीत मुळीच मदत केली नाही. त्यांचा प्रभाव असणार्‍या भागातून मला खूप कमी मते मिळाली आहेत. गिरीशभाऊंनी जर खरच मदत केली असती तर मी २५ हजार मतांनी निवडून आलो असतो…!” असे प्रतिपादन आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगावात पत्रकारांशी बोलतांना केले.

याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज जळगावात पत्रकारांशी बोलतांना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, एखाद्या लोकप्रतिनिधीच्या प्रमाणपत्रासंदर्भात प्रश्न उपस्थित होत असतील तर दूध का दूध, पाणी का पाणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकामंध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, सर्वसामान्य माणसाला अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी दुपारपर्यंत बसून रहावे लागतात. अनेक अटींची पूर्तता करावी लागते; परंतु जेव्हा लोकप्रतिनिधींच्या संदर्भात असे विषय पुढे येतात तेव्हा सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून घेणे गरजेचे आहे. एकनाथ खडसे देखील ही अग्निपरीक्षा देतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. गत विधानसभा निवडणुकीत आमदार गिरीश महाजन यांचा प्रभाव असलेल्या गावांमध्ये आपल्याला कमी मतदान झाले. त्यामुळे निवडणुकीत विजयासाठी त्यांची मदत झाल्याचा दावा खोटा असल्याचेही सांगितले.

खालील व्हिडीओत पहा आमदार चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/388507812747739

Protected Content