मुक्ताईनगर-पंकज कपले | शहरासह तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. पोलीस स्थानकात कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने दोन नंबरवाल्याचे चांगलेच फावल्याचे दिसून येत आहे.
मुक्ताईनगर शहरामध्ये अवैध विमल तसेच अन्य गुटख्याची सर्रास विक्री होत असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यातच प्रभारी राज असल्यामुळे अवैध धंद्यावाले मोकाट सुटलेले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असून दररोज लाखो रुपयांचा गुटखा मुक्तानगर तालुक्यात येत असून हा गुटका नेमका येतो तरी कुठून असा प्रश्न सुद्धा नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. राज्यामध्ये गुटखाबंदी असूनही शहरासह तालुक्यात मात्र गुटखा उघडपणे मिळत असून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे.
मुक्ता नगर शहरातील परिवर्तन चौका लगाताच असलेल्या छोट्या मोठ्या टपर्या अथवा काही मोठ्या आरसीसी बांधकाम दुकानांमध्ये गुटखा हा सर्रासपणे किरकोळ अथवा होलसेल भावात विकला जात आहे. यासंदर्भात वृत्तपत्रातून वारंवार वृत्त प्रसिद्ध झालेले आहे तरीसुद्धा याला चाप लागत नसून पुन्हा जोमाने अवैध गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे.
तलाठी ऑफिसच्या व बस स्टँड मागील बाजूस असलेल्या एका गाळ्यामध्ये सुद्धा लाखो रुपयांचा गुटखा रोजचा देवाणघेवाण केला जात आहे यातून आर्थिक महसूल मिळतो का महसूल मिळत असला तर राज्यात विमल गुटख्याला बंदी का घातलेली आहे हे बंदी का फक्त कागदपत्रावरच आहे का असाही प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.