मुक्ताईनगर प्रतिनिधी । ग्राहकांना अवास्तव वीज बिल आकारणीच्या समस्यांबाबत रोहित काळे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी यावर तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर मधील बरीच लोकांची तक्रार होती की विज बील विद्युत मीटरचे रिडींग नकरताच बिल आकारण्यात येत आहे. आणि बिल सुध्दा खूप जास्त प्रमाणात आकारण्यात येत आहे या मुद्याने त्रस्त असलेल्या संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांनी या प्रकरणाची तक्रार केली. या संदर्भात रोहित काळे यांनी माहिती घेऊन असे दिसून आले की रिडींग घेणारे जे कुणी कंत्राटदार आहेत ते रिडींग घेत नसून त्या मुळे ते लोक अंदाजे रिडींग टाकत आहेत. आणि त्या कारणास्तव बिल जास्त प्रमाणात येत आहे.
या प्रकरणी रोहित काळे यांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेत निवेदनाच्या माध्यमातून ही समस्या त्यांच्या लक्षात आणून दिली. यासोबत बिलाची रक्कम कमी करा आणि त्वरित या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. दरम्यान, कार्यकारी अभियंता यांना रोहित काळे यांनी निवेदन देताच एका दिवसाच्या आत आदेश जारी केले
आहेत.
याच्या अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील विदयुत ग्राहकांना अवास्तव विज बिलांची आकारणी होत असलेबाबत आपल्या उपविभागात अशा प्रकारच्या विदयुत ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असतील तर ताबडतोब मिटर रिडींग एजन्सी व उपविभागांतर्गत येणारे सर्व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी दररोज एकमेंकांशी समन्ध : साधुन आतापर्यंत सरासरीने बिलींग होत असलेल्या विदयुत ग्राहकांना अचुक मिटर रिडींगची आकारणी होईल यासाठी सुयग्य नियोजन करावे. तसेच योग्य दरसंकेतानुसार बिलींग करावे.
शिल्लक असलेल्या बिलींग तक्रारी या हे पत्र मिळाल्यापासुन पाच दिवसांच्या आत दुरूस्त करून ग्राहकांपर्यंत पोहोच करायचे आहे. तसे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास दि ५ जुलै २०२१ पर्यंत न चुकता सादर करावा असे आदेश कार्यकारी अभियंता यांनी जारी केले आहेत. या कारवाईचे रोहित काळे यांनी स्वागत केले आहे.