मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंतुर्ली येथील संदीप बोरसे या दहा वर्षाच्या बालकाचा मोटारसायकलीच्या धडकेत मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी दोषी मोटारसायकल चालकावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, दिनांक २५ रोजी रात्री एमपी ०९ व्हीयू ३२९७ क्रमांकाच्या दुचाकीवरून जाणार्या मोटारसायकलस्वाराने संदीप बोरसे या दहा वर्षाच्या बालकाला धडक दिली होती. संदीपला मागून धडक दिल्यानंतर तिथे न थांबता संबंधीत मोटारसायकलस्वार श्रेयर रितेश पाटील याने घटनास्थळावरून पळ काढला होता. दरम्यान, संदीपला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता २७ रोजी त्याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, श्रेयल रितेश पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याला लागलीच जामीनावर मुक्त करण्यात आल्याची माहिती संदीपच्या आप्तांनी दिली आहे. तर या प्रकरणी अजून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.