मुक्ताईनगर येथील नगरसेविका पुत्राची बांधकाम अभियंत्याला धक्काबुक्की; गुन्हा दाखल

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे नगरसेविका शमीनाबी खान यांचा मुलाने नगरपंचायत बांधकाम अभियंत्यास धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जुने गाव सीड फार्म येथे नगरपंचायत स्थापत्य अभियंता रितेश बच्छाव व बांधकाम लिपिक सचिन काठोके हे आज सकाळी 9.30 वाजता सदरील प्रभागात चालू असलेल्या गटारीचे बांधकाम पाहण्याकरिता गेले असता नगरसेविका शमीनाबी खान यांचा मुलगा आमिन खान, अहमद खान याने बांधकाम अभियंत्यास तुम्ही पूर्वीचा गटारीत पाण्याचा प्रवाह चालू राहू द्या व नवीन बांधलेल्या गटारीत दगड टाकून प्रवाह बंद केला. तेव्हा अभियंत्याने त्यांना म्हटले की, तुम्हाला असे करता येणार नाही. तेव्हा नगरसेवक पुत्राने गाडीची चावी काढून तुम्हाला नगरपंचायत मध्ये येऊन मारहाण करेल अशी धमकी दिली. यावरून मुक्ताईनगर पोलीसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झालेली आहे.

नगरपंचायतीत नेहमी झेरॉक्स कॉपीचा वावर

 

मुक्ताईनगर नगरपंचायत मध्ये नेहमीच नगरसेवक आई  तर कामकाज मुलगा पाहतो तसे नगरसेविका पत्नी तर पतीचा नगरपंचायत मध्ये वावर असतो व कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो अशी दबक्या आवाजात नगरपंचायतीत चर्चा चालू होती

 

Protected Content