मुक्ताईनगर प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजपचा चेहरा कांडेलकर हेच असतील याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
अशोक कांडेलकर हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यांच्या संबंधांमध्ये वितुष्ट आले होते. खडसे यांनी पक्षत्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही कांडेलकर हे भाजपमध्ये राहिले. त्यांनी डॉ. डॉ. राजेंद्र फडके यांच्यासह अन्य पदाधिकार्यांच्या मदतीने मतदारसंघात भाजपची जबाबदारी घेतल्याचे दिसून आले आहे. यातच आज त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले आहे.
अशोक कांडेलकर यांना प्रदेश उपाध्यक्षपद देऊन भाजपने त्यांना बळ दिल्याचे मानले जात आहे. भविष्यात खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमोर भाजपतर्फे अशोक कांडेलकर हेच असतील याचे स्पष्ट संकेत देखील आता मिळाले आहेत.