मुक्ताईनगर, प्रतिनिधी । येथील विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अॅड. रविंद्र पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अजित पवार यांच्या सांगण्यावरून माघारी घेतला असला तरी या आदेशाने नाराज झालेले मतदार संघातील रा.कॉ.चे सगळे लोक प्रतिनिधी व पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आज (दि.७) सायंकाळी रा.कॉ. नेते विनोद तराळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान आपण इतर कोणत्याही उमेदवाराला पाठींबा दिलेला नसून आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे अॅड. पाटील यांनी यावेळी सांगितले. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे वरिष्ठांकडे लगेचच पाठवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी संगितले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सांगण्यावरून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला असला तरी सगळे मतदारसंघातील लोक प्रतिनिधी व पदाधिकारी या निर्णयाने नाराज झाल्याचे उघड झाले आहे.