जळगाव (प्रतिनिधी) शनिवारी पार्किंगच्या किरकोळ कारणावरून एम.जे. कॉलेज परिसरात मुकेश सपकाळे या तरुणाचा खून झाला होता. या खून प्रकरणातील पाचही जणांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलिसांकडून आरोपींची रात्रीपासून कसून चौकशी सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, जुन्या वादातून आणि खुन्नस मधून नाहक तिसऱ्याचा खून झाल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी नेमका कसा वाद झाला?, या वादात कुणी पहिल्यांदा मारण्यास सुरुवात केली? वाद चिघडण्याचे मुख्य कारण कोणते? चॉपरने वार करत असतांना यावेळी कोण-कोण सोबत होते? याबाबत कसून चौकशी सुरु आहे. यापूर्वी देखील संशयित आरोपींवर अनेक गुन्हे केले असल्याने त्या अनुषंगाने आज न्यायालयात दुपारी हजर केल्यावर पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. दरम्यान, संशयितांची ओळख परेडसाठी पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी घेणार असल्याची शक्यता आहे.