Home अर्थ मेहकर येथे महावितरण विभागीय कार्यालय सुरू करणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मेहकर येथे महावितरण विभागीय कार्यालय सुरू करणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

0
29

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मेहकर, सिंदखेडराजा आणि लोणार येथील वीज ग्राहकांच्या समस्या लक्षात घेऊन मेहकर येथे महावितरणचे विभागीय कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ते लोणार येथे महावितरणतर्फे आयोजित वीज ग्राहक मेळाव्यात बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, येथील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी समस्यांची आपल्याला जाणीव आहे. या परिसरात वीजेची समस्या लक्षात घेऊन मेहकर -सुलतानपूर ही नवीन वीज वाहिनी टाकली आहे, ती लोणार पर्यंत वाढविण्यात येणार आहे.

यावेळी ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील पांगरी येथे महावितरणच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्राचे भूमीपूजन करण्यात आले. प्रस्तावित वीज उपकेंद्राच्या उभारणीसाठी ४ कोटी ९३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पांगरी, सिंदखेडा, मालापूर येथील वीज ग्राहकांना आगामी काळात दिलासा मिळणार आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे होते. व्यासपीठावर आमदार संजय रायमुलकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे मुख्य अभियंता भीमराव राऊत, बुलढाणा मंडळ कार्यालयाचे अधिक्षक अभियंता संजय आकोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound