जळगाव प्रतिनिधी । घरगुती इलेक्ट्रिक मीटर कमर्शियल आणि दंड न करण्यासाठी महावितरण कंपनीच्या टेक्निशीयन अधिकार्याला १० हजार रूपयांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने आज रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार यांचे घरगुती मिटर कमर्शियल न करता व दंड न करण्यासाठी महावितरण कंपनीत सिनीयर टेक्नीशीयन शोभना दिलीप कहाने (वय-५६) रा. पवन नगर ममुराबाद रोड यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक गोपाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आज सापळा रचून शोभना कहाने यांनी १० हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
यांनी केली कारवाई
पालीस उपअधिक्षक गोपाल ठाकूर, पो.नि. निलेश लोधी, पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, अशोक अहिरे, सुनिल पाटील, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ , जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर आणि प्रदिप पोळ यांनी ही कारवाई केली.