Home राजकीय जनाब राऊत, तुम्ही सुरक्षेविना फिरून दाखवा ! : पडळकर

जनाब राऊत, तुम्ही सुरक्षेविना फिरून दाखवा ! : पडळकर

0
108

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप नेते आणि या पक्षाच्या समर्थकांना दिलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेवरून टीका करणार्‍या संजय राऊत यांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज आव्हान दिले आहे.

अभिनेत्री कंगना राणावत, नारायण आणि किरीट सोमय्यांसह अनेकांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिल्यावरून आजा दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून  टीका करण्यात आली आहे. वाय सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्राला विशेष सुरक्षा दलाची निर्मिती करावी लागेल असेच दिसते, अशी टीका शिवसेनेने केली आहे. याच मुद्यावरून आजा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे. जनाब संजय राऊत हे वाय सुरक्षेवर लिहित आहेत. त्यांनी हिंमत असेल तर महाराष्ट्रात फिरून दाखवावं, असं आव्हान गोपीचंद पडळकर यांनी दिले  आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की,  जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरवून दाखवा. म्हणजे शेतकर्‍यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल. जनाब राऊत अजूनही ऊर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकर्‍यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय. यावर कधीतरी एखादा लेख लिहा असा टोलादेखील त्यांनी मारला आहे.

याप्रसंगी टीका करतांना पडळकर म्हणाले की, जनाब संजय राऊत तुम्हाला उत्तरप्रेदश व गोवा येथील निवडणूकीत नोटा पेक्षाही कमी मत मिळाले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांना देशपातळीवर लॉंच करून त्यांचा पार फज्जा उडविला आहे.  जेव्हा लाल चौकात पाक आंतकवाद्यांनी ‘कोई माई का लाल तिरंगा लहराके दिखाये’ अशा धमक्या देणारी पोस्टर्स लावली होती. त्यावेळेस नरेंद्र मोदीजींनी धमक्यांना न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता, असंही त्यांनी सांगितलं.

 


Protected Content

Play sound