मु. जे. महाविद्यालयात मुक्त विद्यापीठतर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय  अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  “वर्तमान स्थिती व भविष्यातील वेध ” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रो.भूपेंद्र केसुर संचालक भाषा विद्याशाखा मु जे महाविद्यालय यांनी नवीन शैक्षणिक धोरण पद्धतीबद्दल  सखोल मार्गदर्शन केले.

 

नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली प्रदान करणे आहे. या धोरणात शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण आणि विकास आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात आलेला आहे. या धोरणात मूलभूत साक्षरता आणि  बहुविद्याशाकीय शिक्षणाला चालना देऊन क्रेडिट आधारित प्रणाली सादर करून संशोधन आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान स्थापन करून उच्च शिक्षणात परिवर्तन घडवून आणणे होय. या धोरणात विद्यार्थ्यांना स्वायत्तता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असून कोणत्याही शाखेचा विद्यार्थी कोणताही विषय शिकू शकतो या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाची रचना भविष्यातील धोरणाची रूपरेषा व भविष्यातील वाटचाल याविषयी मार्गदर्शन केले.

 

डॉ. प्रमोद रसाळ यांनी शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी व व मुक्त विद्यापीठात शैक्षणिक धोरण राबवित असताना कोणकोणते घटक विचारात घ्यावे लागतील तसेच मुक्त विद्यापीठामार्फत चालू असलेले विविध अभ्यासक्रम विद्यापीठाने केलेली उल्लेखनीय प्रगती व भविष्यातील वाटचाल याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे  प्राचार्य तथा या कार्यशाळेचे प्रमुख अतिथी डॉ. संजय  भारंबे यांनी आपल्या  भाषणात नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचे आहे. विद्यार्थी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध होणारी रोजगार संधी व भविष्यातील वाटचाल या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले

 

या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार केंद्रसंयोजक प्रा.डॉ. जुगलकिशोर दुबे यांनी केले. या कार्यशाळेसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व अभ्यास केंद्राचे केंद्रप्रमुख,  केंद्रसंयोजक व सहकारी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी  सुनील निकम,  अमोल पाटील,   योगेश जेजुरे,  श्रावण कसबे, या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी   प्रविण बारी, युवराज चौधरी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर  कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content