अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| शहरातील रहिवासी तन्वीर शेख मुक्तार याला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले असून आज ही कारवाई करण्यात आली.
शहरातील कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने, अमळनेरात आणखी एका जनावर एमपीडीए ची कारवाई करण्यात आली असून, तन्वीर शेख मुक्तार (रा. अमळनेर) असे या इसमाचे नाव आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यास स्थानबद्ध करण्याचे नुकतेच आदेश दिले होते.त्याच्यावर शहरात तसेच समाजात अशांतता पसरवणे याबरोबरच इतर समाजास बाधा निर्माण होईल असे कृत्य करणे असे विविध गुन्हे त्याच्यावर होते.या सर्वांची खात्री पटली असता त्याला ठाणे येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
अमळनेरातली एम पी डी ए ची ही सहावी कारवाई असुन याआधी देखील,पोलीस निरीक्षक विजय शिंदे व अमळनेर च्या सर्व पोलीस टीमने पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सततच्या या कार्यवाहींमुळे गुन्हेगारी विश्व हादरले असून याचा कायदा व सुव्यवस्थेवर अनुकुल परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे. या कारवाईचे सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे.
तन्वीर शेख मुक्तार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असल्याने त्याला एमपीडीएच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकार्यांना सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.