अंधारी तांड्याला महसूल दर्जा मिळण्याबाबत मागणी 

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी| तालुक्यातील अंधारी तांड्याला महसूल दर्जा मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अंधारी ग्रामपंचायत अंतर्गत अंधारी तांडा येतो. या अंधारी तांड्याची स्त्री -पूरूष मिळून ८५६ लोकसंख्या असून १७६ कुटुंब आहे. ग्रृप ग्रामपंचायत असल्याने तांड्याचा हवा तसा विकास साधता येत नाही. म्हणून सदर तांड्याला महसूल दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे अंधारी तांड्याला महसूल दर्जा द्यावा जेणेकरून तांड्याचा कायापालट करता येईल या आशयाचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य संजय राठोड यांनी ग्रामस्थांसह  नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना दिले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय न राठोड, युवासेना जिल्हा उपप्रमुख संदिप राठोड, मा. सरपंच विजय राठोड, बबलु चव्हाण, योगेश राठोड, वसंत चव्हाण, पोपट दगडू देवरे, रूपसिंग जाधव, रवींद्र राठोड आदी उपस्थित होते.

Protected Content