जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात राहणारा गुन्हेगार गणेश उर्फ नाना शांताराम कोळी (वय-३७) याला अटक करून एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे. त्यानुसार त्याला अटक करून ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात गुन्हेगार गणेश कोळी हा रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्यांच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत. तरी देखील त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गणेश कोळी याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्यात यावी असा अहवाल जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार अहवालाचे अवलोकन करून पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एमपीडीए कायद्यांर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश काढले. त्यानुसार रामानंद नगर पोलीसांना त्याला अटक करून ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गावळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या सुचनेनुसार रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनिल दामोदरे, राजेश चव्हाण, विजय खैरे, पो.ना. रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलीक आणि पोकॉ ईश्वर पाटील यांनी केली आहे.