जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज खान्देश एजुकेशन सोसायटीला सदिच्छा भेट दिली. यावेळी अध्यक्ष डॉ.नंदूकुमार बेंडाळे यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांची उपस्थिती होती.
यावेळी खासदार उन्मेष पाटील यांना संस्थेच्या भावी नियोजनबाबत डॉ. बेंडाळे यांनी माहिती दिली. तसेच उन्मेष पाटील यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी एम.जे. महाविद्यालयातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेच्या भरभराटीसाठी जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, त्यासाठी अग्रेसर राहीन अशी ग्वाही दिली. यावेळी सस्थेचे कोषाध्यक्ष सुरेश चीरमाडे, नियोजन कमेटी सदस्य हरीश मिलवाणी , क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जी एम फाऊंडेशन चे अरविंद देशमुख, जयेश ठाकूर , स्वप्नील भांडारकर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.