वरणगाव – दत्तात्रय गुरव | वरणगाव बायपास महामार्गामुळे शहरापासून जुना महामार्ग दुरावला होता. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलने आणि पाठपूराव्यानंतर केंद्र सरकारने अखेर साडेतीन कोटी रुपये मंजूर केले. आज, मंगळवारी वरणगाव बसस्थानक चौकात भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी तालुक्याचे आमदार संजय सावकारे , डॉक्टर राजेंद्र फडके वरणगावची माजी नगराध्यक्ष सुनील काळे सहकार मित्र चंद्रकांत हरी बडे सर आदी मान्यवर उपस्थित होते यासह वरणगाव शहरातील बहुसंख्य नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते