लखनऊ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या मुलाच्या ताफ्याताली फॉर्च्युनर कारने दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. खासदारपुत्राच्या ताफ्यातील UP. HW. 1800 या व्हाइट रंगाच्या फॉर्च्युनर कारने तिघांना धडक दिली, त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या मुलाच्या ताफ्यातील कारने भरधाव वेगात तिघांना उडवले. त्यामध्ये, दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. करण ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे उत्तर प्रदेशातील उमेदवार आहेत.