नवी दिल्ली । सार्वजनीक क्षेत्रातल्या देशातील चार मोठ्या बँकांचे खासगीकरण करण्यासाठी हालचाली गतीमान झाल्या असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार देशातील चार बँकांचे खासगीकरण लवकरच होऊ शकते. या बँकांचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने हलचाली सुरु केल्या आहेत. यामध्ये पंजाब अॅण्ड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युसीओ बँक आणि आयडीबीआय बँक या चार मोठ्या बँकाचा समावेश आहे. या बँकांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सरकारी गुंतवणूकीचा मोठा वाटा आहे. मात्र आता सरकारला समभागची विक्री करुन निर्गुतवणूक करण्याच्या तयारीत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने अर्थमंत्रालयाला नुसतेच एक पत्र पाठवून खासगीकरणाच्या प्रक्रियेला वेग आणावा अशी सूचना केली होती. पैसा उभारण्यासाठी आणि सरकारी बँकांची परिस्थिती स्थीर ठेवण्यासाठी सरकाराने सार्वजनिक क्षेत्रातील पाचच बँकांमध्ये गूंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून इतर बँकांचे खासगीकरण केले जाणार असल्याचे या वृत्तात म्हटलं आहे. साधारणपणे वर्ष अखेरीस प्रत्यक्ष खासगीकरण होणार असले तरी याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.