भुसावळ, प्रतिनिधी | सर्वोच न्यायालय नवी दिल्ली यांनी भुसावळ नगरपालिकेला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विक्रीच्या रकमा मुदतीत अदा करणे बाबतचे ३
वेळा आदेश देवूनही मुख्याधिकारी यांनी सर्वोच न्यायालयाचा अवमान केलेला आहे. याबाबत शासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे चौकशी कामी पत्र देण्यात आले असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १५ दिवसाच्या आत रक्कम अदा न केल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा भुसावळ म्युन्सिपल पेन्शनर्स असोसिएशन तर्फे प्रसिद्धीपत्राद्वारे देण्यात आला आहे.
भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी ६ व्या वेतन आयोगांच्या फरकांची रक्कम कार्यरत कर्मचाऱ्यांना १ वर्षापुर्वीच अदा केलेली असुन मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी विनंती अर्ज देवूनही कोर्टाचे आदेश होवूनही अद्याप पर्यंत मुख्याधिकारी यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आज पावेतो रकम अदा केलेली नाही.
याबाबत शासनाचे वरिष्ठ कार्यालयाकडे चौकशीसाठी वेळोवेळी पत्र दिलेले आहे. तसेच शासनाने ७ व्या वेतन आयोगाचे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ७ व्या पे कमिशन लागू करणेसाठी आदेश दिलेले असून भुसावळ नगर परिषद मुख्याधिकारी यांनी फक्त ७ वा वेतन आयोगाप्रमाणे पगार निश्चिती व पेन्शन निश्चिती केलेली आहे. यातून मुख्याधिकारी निवृत्तकर्मचाऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.