अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुलेट मोटारसायकल मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी १ डिसेंबर रोजी रात्री जैन एरिगेशन कंपनीसमोर घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, कपील भागवत कुमावत वय २३ रा.बांभोरी ता.धरणगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी १ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कपील हा त्याची बुलेट मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ बीझेड १७७१) ने पाळधीकडून बांभोरी येथे घरी येत असतांना जैन एरीगेशन कंपनीसमोर मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकल जोरदार धडक दिली. या धडकेत कपील कुमावत हा जखमी झाला. त्याला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्याचा भाऊ संदीप कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनिल लोहार हे करीत आहे.

Protected Content